बुलढाणा:- पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज 1ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत शिवसेनेच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या निमित्ताने आयोजित तीन सभांना ते संबोधित करणार आहेत.मेहकर, चिखली, जळगाव जामोद येथील सर्वांना मंत्री गुलाबराव पाटील खा. प्रतापराव जाधव शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर सभांना संबोधित करणार असून बुलढाणा येथे होणाऱ्या सभेला संजय गायकवाड संबोधित करणार आहेत. एकाच दिवसात होणाऱ्या या चारी ही सभांना जनसागर लोटणार असल्याने आज जिल्हाभर भगवी लाट उसळणार आहे.या हिंदू गर्व गर्जना यात्रेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे खा. प्रतापराव जाधव ,आ.संजय गायकवाड,आ.संजय रायमुलकर यांनी सांगितले. मेहकर येथील सभा सकाळी 10 वाजता कृषी वैभव लाॅन येथे आयोजित करण्यात आली आहे .त्यानंतर दुसरी सभा दुपारी 1 वाजता चिखली येथील मौनीबाबा संस्थान येथे तर 3 सभा सायंकाळी 5 वाजता जळगाव जामोद येथे पार पडणार आहे याशिवाय सकाळी 10:30 वाजता बुलढाणा येथील सभेला आमदार संजय गायकवाड संबोधित करणार आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार प्रतापराव जाधव शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्यासह आ संजय गायकवाड ,आ संजय रायमुलकर या सर्वांना उपस्थित राहणार आहेत या चारही सभांना तुफान गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीस दलाने चौक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे
शिवसेनेच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभांना संबोधित करणार... गुलाबराव पाटील
Hanuman Sena News
0
إرسال تعليق