Hanuman Sena News

हनुमान सेनेकडून लंम्पी आजाराने मृत पडलेल्या गो-मातेचा सन्मानपूर्वक अंत्यविधी...

मलकापूर:-  साईनगर मधील आरव अॅक्वा च्या शेजारी एक जर्सी जातीची गाय लंम्पी आजाराने  ग्रस्त असलेली माहिती हनुमान सेनेचे सागर भाऊ बेलोकार यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन तेथील संपूर्ण माहिती पशुवैद्यकीय यांना भ्रमणध्वनी द्वारे सांगितली. पशुवैद्यकीय टीम घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी लंम्पी आजारावरची लस त्या गाईला दिली .पण त्यांना त्या गाईचे प्राण वाचवता आले नाही ही माहिती सागर भाऊ यांनी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप व नानाभाऊ येशी यांना सांगितली. त्या ठिकाणी हनुमान सेनेकडून जेसीबी बोलावून खड्डा करून त्या गाईची विधिवत पूजा करून पुरवण्यात आले. पण एक विशेष ज्या मालकाची गाय आहे त्यांनी साफ नकार दिला की ही गाय माझी नाही.शेतकरी वर्गांना व पशुपालन करणाऱ्या व्यक्तींना एक नम्र विनंती आहे की लंम्पी आजारांमध्ये आपल्या गुराढोरांना दूर करू नका त्यांना योग्य वेळी उपचार करावा लांम्पी आजाराची लस द्यावी. व लंम्पी सारख्या आजाराला घाबरण्याचे कारण नाही .त्यामुळे आपल्या जनावरांना वाऱ्यावर सोडू नका. यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप, नानाभाऊ येशी,सागर भाऊ बेलोकार, मिलिंद भाऊ बोंबाटकर ,राजू वाणेरे,आनंद गोलीवाले, ऋतिक सावळे, कपिल कापसे,ई. हनुमान सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم