Hanuman Sena News

सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने संपविली आपली जीवन यात्रा...

चिखली:- बिचारीने सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती मात्र तिच्या स्वप्नांचा चुराळा करण्याचे काम तिच्या उच्चशिक्षित नवऱ्याने केले सोने देऊनही तुझ्या वडिलांनी सोने कमी दिले असे म्हणत नवऱ्यासह सासू-सासर्‍यांनी तिला प्रचंड शारीरिक मानसिक छळ केला. या क्षणाला कंटाळून तिने 20 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.चिखली शहरातील संभाजी नगरात ही घटना घडली चिखली पोलीस ठाण्यात नवऱ्यासह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा अक्षय गायकवाड (19 संभाजीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पूजाचे वडील प्रकाश गणपतराव सोळंकी (60 रा.कुंभारझरी ता.जाफराबाद) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली पूजाचे लग्न 18 जून 2022 रोजी चिखली शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या अक्षय जनार्दन गायकवाड यांच्याशी झाले होते लग्नात त्यांच्या मागणीनुसार पाच तोळे सोने देण्यात आले होते मात्र लग्नानंतर सिविल इंजिनियर असलेला पूजेचा नवरा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता तुझ्या बापाने लग्नात सोने कमी दिले असे टोमणे तिला मारण्यात येत होते. आमच्याकडे खूप पैसा आहे तुझ्या जेवनात विश टाकून तुला मारून टाकीन असे सासू तिला म्हणत असे.पूजाने संपूर्ण हकीकत माहेरकडील मंडळींना सांगितले. यावरून तिच्या घरी वाद झाला होता .तिने फोनवरून याबाबत माहेरच्यांना कळवले होते त्यामुळे माहेरची लोक वाद मिटवण्यासाठी 20 सप्टेंबरला चिखलीला येणारच होते. मात्र त्याचपूर्वी पूजाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे याबाबत पूजाच्या सासरकडील मंडळींनी आपल्याला काहीएक कळवले नसल्याचा आरोप पूजाच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलिसांनी याबाबत पूजेच्या आई-वडिलांना कळवले. मात्र पूजाचे आई-वडील घटनास्थळी पोहोचण्याआधी पूजाचा मृतदेह फासावरून उतरवण्यात आला. पूजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पूजाचा नवरा अक्षय जनार्दन गायकवाड सासू अनिता जनार्दन गायकवाड सासरा जनार्दन रामराव गायकवाड दीर प्रशांत जनार्दन गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चिखली पोलीस करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم