विशेष प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित अशा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. उमाळीचा निकाल काल लागला असून यात भाजपा प्रणित जय किसान शेतकरी सहकारी पॅनलचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार बहुतांश मताधिक्याने निवडून आले आहेत ही निवडणूक मागील बहुतांश वेळेस बिनविरोध होत होती यावेळी सुद्धा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपानेते शिवचंद्रजी तायडे यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु विरोधकांच्या हट्टापायी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत माजी आमदार चैनसुख जी संचेती यांच्या मार्गदर्शनात व श्री शिवचंद्र जी तायडे यांच्या कुशल नियोजनात विरोधकांचा सुपडा साफ करत उमाळी सोसायटीवर भाजपा प्रणित जय किसान शेतकरी सहकार पॅनलने आपला झेंडा रोवला निकाल लागताच उमाळी येथे माजी आमदार चेनसुख जी संचेती, भाजपा नेते शिवचंद्र तायडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ उमाताई तायडे, भाजपा जिल्हा महामंत्री मोहनजी शर्मा, तालुका अध्यक्ष संजय काजळे, भाजपा नेते आनंदा शिरसाट ,अमृत बोंबटकर,राजेंद्र पवार आदींसह विजयी उमेदवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
إرسال تعليق