मलकापुर शहरात अल्पसंख्यांक समुदाय मोठया प्रमाणात असुन या ठिकाणी अल्पसंख्यांक विदयार्थी- विदयार्थीनी करीता उच्च शिक्षणाची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही.त्यामुळे मलकापुर शहरात प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत (पुर्वीचा बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम) अंतर्गत शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविदयालय मंजुर करण्यात यावे अशी मागणी राज्य शसनाकडे लावून धरलेली होती,त्यानुसार प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK) या केंद्र पुरस्कत योजने अंतर्गत मलकापूर शहरामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविदयालय स्थापन करणेबाबतचा सविस्तर प्रस्ताव परिपूर्ण अंदाजपत्रक (Detail estimate),जागेची उपलब्धता व सविस्तर आराखडयासह शासनास सादर करणेसाठी अल्पसंख्याक विकास विभाग,मुंबई यांचे पत्रानुसार कळविण्यात आले होते,आजरोजी जिल्हाधिकारी कार्यालय,बुलढाणा यांचे दालनात संयुक्त बैठक पार पडली यावेळी अंतर्गत शासकीय अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविदयालय मंजुर करण्यात बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आणी लवकरच याबाबतची सर्व पक्रीया पार पाडण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले...!!
सदर बैठक जिल्हाधिकारी श्री.एस राममूर्ती यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली,यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.लाड साहेब,उपविभागीय अधिकारी श्री.मनोज देशमुख साहेब,तहसीलदार श्री.राजेंद्र सुरडकर साहेब,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री.सचिन तायडे व फुंडकर साहेब गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक खामगाव चे प्राचार्य श्री.समीर प्रभूने हे उपस्थीत होते....!!
إرسال تعليق