आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या व्यक्त यावरून वाद निर्माण झाला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची खाज सुटली आहे. असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाले .असून त्यांनी तानाजी सावंत यांना माफी मागण्यास सांगितले आहे. तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना जर तारतम्य बाळगावी काय बोलताय तुम्ही भानावर आहात का तुम्ही जर आमच्या भूमिकेसाठी काही करता येत नसेल तर किमान विरुद्ध अपशब्द बोलू नका आपण आमच्या समाजाच्या भावना दुखावलेल्या आहे त्यासाठी आधी आमच्या समाजाची माफी मागा. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे तुमचे सरकार आले म्हणून तुम्ही बिनबडाचे आरोप करत सुटला आहात या मराठ्यांना खाज आली आहे एवढा बोलण्यापर्यंत तुमची मजल गेली आहे .सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका आम्ही एस सी मधून कधीच आरक्षण मागितले नाही .ना भविष्यात कधी मागणार त्यामुळे तुम्ही आपली विधान करून आपली प्रत घालू नका. ज्यावेळी तुम्ही गुहाटीला पळून गेलात तेव्हा आम्ही तुमच्या बाजूने होतो, त्यामुळे तुम्ही सुखा सुखी सरकार स्थापन करू शकलात. जर हा मराठा समाज तुमच्या विरोधात गेला असता, तर तुम्हाला कोणी जगू दिले नसत जर तुम्हाला काही माहीत नसेल तर त्यावर बोलू नका ,असा इशारा मराठा क्रांती मोर्चा ने दिला आहे
सत्तेची एवढी हवा डोक्यात जाऊ देऊ नका ! माफी मागा तानाजी सावंत यांना इशारा... मराठा क्रांती मोर्चा
Hanuman Sena News
0
إرسال تعليق