Hanuman Sena News

डोणगाव ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करावे...

बुलढाणा : महिला सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवणाऱ्या डोनगाव ग्रामपंचायत सचिवाविरोधात गावकरी एकवटले असून त्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे. या ग्रामपंचायत सचिवाने नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकविल्याचं सीसीटीव्ही फुटेज दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. त्यामध्ये जनता बदमाश आहे, मतदान करणारे चोर आहेत असंही हा ग्रामपंचायत सचिव त्या महिला सरपंचाला सांगताना दिसत आहे.संबंधित  बदमाश, मतदान करणारे चोर... ग्रामसेवकाचा महिला सरपंचाला भ्रष्टाचार कसा करायचा याचा पाठ या संबंधित व्हिडीओ गावात व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यानंतर आता गावकऱ्यांनी त्या ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचे सचिव ज्ञानेश्वर चनखोरे हे नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकवितानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. यात ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव, महिला सारपंचाचा पती रवी पांडव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल आणि प्रदीप परमाळे असे सर्व ग्रामपंचायतच्या कार्यालयात बसलेले असताना सीसीटीव्ही फुटेज आहे ग्रामसचिव हा महिला सरपंच झाला म्हणतो की पावसाळा लागली की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे जसं जळतं तसं जळू द्यायचं कारण जनता बदमाश आहे शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केलं आहे एकाही चोराने फुकट मतदान केलं नाही मतदान करणारे चोर आहेत आपण इथं पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे जनतेच्या जीवावर निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सेवेसाठी नोकरी करत असलेले सरकारी नोकरांची सर जनतेच्या प्रतीही मानसिकता असेल तर काय म्हणायचं अशीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी असण्याची शक्यता आहे मात्र नवख्या सरपंचाला भ्रष्टाचाराचे पाठ शिकवणारे ग्रामसेवक मात्र जरा वेगळेच असतील घडलेल्या या प्रकारावर आणि सीसीटीव्ही फुटेजवर गावकऱ्यांनी तर आक्रमक भूमिका घेतली आहे आता बुलढाणा जिल्हाधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे

Post a Comment

أحدث أقدم