योगेश काजळे
विशेष प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील वडोदा येथे वियोगी नगर ते हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वात वडोदा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत वर मोर्चा काढला होता सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात काळात लोकशाही मार्गाने आणखी आंदोलन तीव्र करावे लागेल असा इशारा प्रशांत गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला यावेळी संतोष घोडके,सचिन इंगळे,शिवदास राऊत,गणेश इंगळे,विवेक गायकवाड,विष्णू मानकर,बाबुराव वनारे ,मंगेश अकोटकर,विनोद गायकवाड,सुनील आकोटकर,किशोर खंडारे,सुनील पिठेकर,संदीप वनारे,पुरुषोत्तम वनारे,विठ्ठल गायकवाड,सुधाकर इंगळे,विनोद पवार ,उमेश डोंगे,संतोष गायकवाड,यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते
إرسال تعليق