बुलढाणा:- लम्पी या आजाराचा मनुष्यास धोका आहे असा नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता .लम्पी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे जनावरात आढळून आलेल्या लंपी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या आजारासाठी वेळीच उपचार केल्यास जनावरे पुर्णपणे बरी होतात, तसेच मनुष्यास या आजाराच्या संसर्गाचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या क्रमांकावरून नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.लंपी आजाराची जनावरे आढळून आल्याने या रोगाचा प्रसार झालेला असून बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करुन आजारावर नियंत्रण करण्यात येत आहे.आजारासंबंधी पशुपालकांच्या तक्रारी निवारण करण्याकरिता पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९६२ व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाचा क्रमांक- ०७२६२-२४२६८३ व टोल फ्री क्रमांक १०७७ सुरु करण्यात आला आहे.पशू पालकांनी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.
लंम्पी या आजाराचा मनुष्यास धोका नाही... डॉ.भुवनेश्वर बोरकर
Hanuman Sena News
0
إرسال تعليق