Hanuman Sena News

दिव्यांग मुलीशी प्रेम विवाह करून फक्त तिच्या माहेरच्या पैशावर होता डोळा...

शेगाव :- वर्षभरापूर्वी आळंदी येथे त्यांचा प्रेम विवाह झाला. ती 50% दिव्यांग असूनही त्याने तिला स्वीकारले त्यामुळे आपला नवरा खूपच गुणी आणि मोठ्या मनाचा असल्याचे तिला वाटायचे. पण लग्नाची नवी नवलाई संपली आणि त्याच्या खऱ्या खुऱ्या रूपाचे दर्शन तिला झाले .आता नवरा अगदी राक्षसासारखा हिंसक बनतो, त्याने माझ्या जीवनाला नरक बनवले कशी तक्रार देण्याची वेळ विवाहितेवर आली .शेगाव शहर पोलीस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली आहे. सौ रेणुका आकाश भालेराव या विवाहितेने या प्रकरणी तक्रार दिली. यावर्षी जुलै महिन्यात आळंदी देवाचे तिथे तिने व अकोटच्या काँग्रेस नगरातील राहणारा आकाश विजय भालेराव यांचा प्रेम विवाह संपन्न झाला. लग्नात पाच लाख रुपये हुंडा,दागिने, घरगुती वस्तू दिल्या होत्या. मात्र नवरा आकाश व त्याच्या घरचे त्यात समाधानी नव्हते. असे तक्रारीत म्हटले आहे. नवरा आकाश लग्नानंतर दारू पिऊ लागला त्यानंतर तो हिंसक व्हायचा बायकोवर थुंकायचा आणि तिला मारायचा तुझे जीवन नरक बनवील असे तो म्हणायचा. असे तिने तक्रारीत म्हटले आहे दारू पिल्यानंतर तो त्याचे नियंत्रण गमावतो आणि राक्षसासारखा क्रूर वागतो असेही तक्रारीत म्हटले आहे. माहेरवरून पाच लाख रुपये आणण्यासाठी त्याने तिच्याभोवती तगादा लावला तिच्याशी तो हिंसकपणे वागून तिच्यावर अत्याचार करू लागला. तो व्यापारी वृत्तीचा असल्याने त्याला फक्त पैसेच पाहिजे होते तो माझी कोणतीच काळजी घेत नव्हता असा पिढीत विवाहितेने आरोप केला आहे. सात डिसेंबर 2021 म्हणजे अवघ्या  काही महिन्यांतच सासरच्या लोकांनी मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून लावले. तेव्हापासून ती माहेरी आहे. नवऱ्याच्या व सासरच्या लोकांच्या वागणुकीत कोणताही बदल होत नसल्याने तिने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पती आकाश सह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم