स्वप्निल पाटील
2 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाच्या 2019 मधील सरळ सेवा भरतीचे स्थगिती उठवून सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम वाहन चाचणी घेण्यात यावी तसेच प्रशिक्षण राहिलेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू करावे या मागणीसाठी मनसेचे पदाधिकारी आणि पात्र उमेदवाराने विभाग नियंत्रक स्वप्निल धनाड यांना घेराव घातला याप्रसंगी मनसे पदाधिकारी व महामंडळाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली यावेळी विभाग नियंत्रक यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या पत्राचा दाखला देत मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आर्थिक काटकसरीच्या अनुषंगाने स्थगिती दिली आहे असे सांगितले यावेळी मनसे जिल्हा संघटक मनोज भाऊ पवार व सेवा भरतीतील पात्र उमेदवार यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते
إرسال تعليق