अमरावती:- प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा वादात सापडले आहे. बोलताना मध्ये अडवण्याचा राग आल्याने बच्चू कडू यांनी एका माणसाच्या कानाखाली मारली आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काहींना कानाखाली खाणार हा माणूस त्यांच्याच प्रहार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी म्हटले आहे की हा माणूस विकास कामाबद्दल बोलणारा सर्वसामान्य नागरिक होता. ही घटना अमरावती जिल्ह्यातील गणोजा गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या गावात आमदार बच्चुभाऊ कडू गेले होते आणि विकास कामाच्या मुद्द्यावरून तिथे वाद सुरू झाला होता. ज्या व्यक्तीला कानाखाली मारण्यात आलेले आहे, ती व्यक्ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, ज्याचा राग आल्याने आमदार बच्चू कडू यांनी त्याला 'ऐकून घे आधी शांत बस 'असे म्हणत दटावले होते. यानंतर त्यांनी या व्यक्तीच्या कानाखाली मारली. चांदूरबाजार तालुक्यातील गणोजा गावामध्ये आमदार बच्चू कडू हे एका रस्त्याच्या भूमी पूजनाच्या कामासाठी आले होते. यावेळी स्थानिकांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. एका व्यक्तीशी बच्चू कडू हे बोलत असताना ज्या व्यक्तीचा बच्चू कडू यांनी कानाखाली मारली तो मधोमध बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा राग आल्याने बच्चू कडू यांनी त्याच्या कानाखाली मारली.
आमदार बच्चूभाऊ कडू पुन्हा एकदा वादात...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق