Hanuman Sena News

सरसंघचालकाची प्रथमच मशिदीला भेट! ईमांमांशी व मदरशातील मुलांशी साधला संवाद...


नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत  यांच्या भेटीनंतर अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांनी मोहन भागवत हे राष्ट्रपिता असल्याचे वक्तव्य केले आहे. मोहन भागवत यांनी दिल्ली येथील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट दिली. या दरम्यान त्यांनी भारतीय इमाम संघटनेच्या कार्यालयाला भेट देत इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीनंतर इमाम उमर अहमद इलियासी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोहन भागवत हे राष्ट्रपिता असल्याचे वक्तव्य केले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमाम इलियासी यांना विचारण्यात आले की, काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी भारतातील हिंदू आणि मुस्लीमांचा डीएनए एक आहे.  मुस्लीमांशिवाय हिंदुस्तान पूर्ण होत नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर इमाम इलियासी म्हणाले, मोहन भागवतांनी जे म्हटले आहे ते बरोबर आहे. ते राष्ट्रपिता आहेत. ते जे म्हणाले ते अगदी योग्य आहे. आम्ही सर्वजण हेच मानतो की आधी देश महत्त्वाचा आहे. तसेच आम्हा सर्वांचा डीएनए एकच आहे, फक्त परमेश्वराची प्रार्थना करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, मदरशामध्‍ये आरएसएस प्रमुखांनी मुलांशी चर्चा देखील केली.

Post a Comment

أحدث أقدم