बुलढाणा : गत दाेन वर्षांपासून संचालक मंडळांचा कार्यकाळ संपूनही रखडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग आता माेकळा झाला आहे़. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़. याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे़, त्यामुळे जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता निवडणुकीची लगबग सुरू हाेणार आहे़.काेराेनामुळे गत दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या हाेत्या, त्यामुळे काही बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ देण्यात आली हाेती़. ही मुदतवाढ संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मेहकर, देऊळगाव राजा आणि लाेणार येथे शासकीय प्रशासक तर बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामाेद, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर, माेताळा, लाेणार, सिंदखेडराजा येथे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. शेगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाला डिसेंबरअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध कारणांमुळे निवडणुका रखडल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार प्रशासक करीत आहेत. अखेर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق