Hanuman Sena News

भाजपाची लोकसभेची ताकद वाढवण्यासाठी मी पुन्हा येईल... केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

बुलढाणा:-  केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी 19 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांची संवाद साधला यावेळी बुलढाण्यात कशासाठी आलो ते त्यांनी सांगून टाकले ज्या लोकसभा क्षेत्रात भाजपाचे खासदार नाहीत अशा देशातील 144 लोकसभा क्षेत्रात भाजपाचा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री जाणार आहेत मात्र बुलढाण्यात लोकसभा क्षेत्रात युतीचा खासदार असताना लोकसभा प्रवास योजनेचे कारण काय असा प्रश्न भूपेंद्र यादव यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले की जिथे युतीचा उमेदवार आहे तिथे युतीच्या उमेदवाराला विजयी करू सहयोगी पक्षाला मदत करू 140 लोकसभा क्षेत्रात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी ही प्रवास योजना आहे भाजपाच्या वाढलेल्या ताकदीचा सहयोगी पक्षाला फायदाच होईल असे ते म्हणाले लोक आम्हाला धोका देतात मात्र भाजपा युती धर्म पालन करणारा पक्ष असल्याचे यादव यांनी म्हटलेभाजपाचा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत 2024 पर्यंत पुन्हा पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले तत्पूर्वी श्री यादव यांनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली केंद्र सरकारच्या धोरणांमुळे भारत प्रत्यक्षेत्रात प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले कोविड संकट काळानंतर मात करून भारताने आगे कुच केले भाजपाचा प्रयत्न समरस समाज निर्मितीसाठी असल्याचेही त्यांनी सांगितले राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर जिल्ह्याला काय मिळेल हे आमदार संजय कुटे यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ फुंडकर ,चिखलीचे आमदार श्वेता ताई महाले मलकापूरचे माजी आमदार चेनसुख संचेती, विजयराज शिंदे, बुलढाण्याचे आमदार संजू भाऊ गायकवाड, तोताराम कायंदे ,भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोळे ,माजी जिल्हाध्यक्ष धुरपतराव सावळे तसेच भाजपा पदाधिकारी व शिंदे गटातील नेते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم