दसरा मेळाव्यात सोनिया गांधी व शरद पवारांचे विचार मांडू नका, असा उपरोधिक टोला शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला आहे. ते म्हणाले - '3 तासांच्या सभेत काय लढाई? कोणाकडे जास्त गर्दी होते याकडे लोकांचे लक्ष आहे. त्याला महत्त्व आहे. फक्त तिथे सोनिया गांधी. पवारांचे विचार मांडू नका. म्हणजे झाले.'गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही बीकेसी मैदानातील सभेची तयारी सुरू केली आहे. त्यांना शिवतीर्थ मिळाले हे आम्ही मान्य केले आहे. त्यामुळे यात आम्ही लढाई जिंकलो वगैरे असे काही नाही. शिवसेना पक्ष कोर्टात गेला नव्हता. एक आमदार कोर्टात गेला. त्यांनी परवानगी मागितली. त्यांना शिवतीर्थ मैदान मिळू नये, असे आम्ही कधीही म्हटलो नाही. त्यांची पण सभा होऊ द्या. चांगली गोष्ट आहे. फक्त त्याठिकाणी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे विचार मांडू नका, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणे हा उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. एक नेता, एक मैदान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेचे शिवाजी पार्कशी भावनिक नाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कमधून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करायचे आहे.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी जमवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले तर आगामी निवडणुकीत भाजपशी लढणे त्यांना सोपे जाईल.
दसरा मेळाव्यात सोनिया गांधी व शरद पवारांचे विचार मांडू नका...गुलाबराव पाटील
Hanuman Sena News
0
إرسال تعليق