Hanuman Sena News

काही महिन्यापासून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या जिल्ह्यात...

बुलढाणा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारी एखादी टोळी जिल्ह्यात सक्रिय अशा चर्चांना आता गावोगावी सुरुवात झाली आहे त्याला कारणही तसेच आहे गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या आहेत या मुली पुढे कुठे जातात त्यांना कुठल्या विचित्र व्यवसायात तर ढकलल्या जात नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत असून पोलिसांनी जरा अधिक गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे काल १२ सप्टेंबरला मोताळा तालुक्यातील धामणगावडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोल्ही गवळी येथून अकरावी शिकणाऱ्या सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय तर चिखली तालुक्यातील शिवाजी विद्यालयाच्या शाळेच्या गेटवरून अल्पवयीन मुलगी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दोन दिवसापूर्वी संग्रामपुरात एका शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र मुलीने अपहरण करणाऱ्या महिलेच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका करून घेतली होती दरम्यान तशीच टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे अपहरण झालेल्या मुलीच्या आईने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मुलीची आई शेतात गेली होती संध्याकाळी घरी परतली तेव्हा मुलगी घरी नव्हती मोठ्या बहिणीने ती दुपारी एक पासून गायब असल्याचे सांगितले त्यामुळे माझ्या लेकीचे कुणीतरी अपहरण केले असावे असा संशय मुलीच्या आईने तक्रारीत व्यक्त केला आहे चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील शिवाजी विद्यालयात शिकणारी मुलगी मैत्रिणी सोबत शाळेत गेली शाळेच्या गेटवरून तिच्या मैत्रिणी वर्गात गेल्या ती मात्र वर्गात पोहोचली नाही त्यामुळे शाळेच्या गेटवरून तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार अंढेरा पोलीस ठाण्यातही देण्यात आली आहे तरी नागरिकांनी गांभीर्याने व सतर्क राहण्याची गरज आहे असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे

Post a Comment

أحدث أقدم