मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता कॉन्स्टेबल रॅंकच्या कर्मचा-यांना खात्यांतर्गत २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ठाकरे सरकारने डीजी लोन ही सुविधा बंद केली होती. ती आता फडणवीसांनी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने फडणवीसांनी ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे.डीजी लोन ही महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.डीजी लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार, आता पोलिसांना २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे- फडणवीस सरकारने पोलिसांना १५ लाखांत घरे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत २० लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق