मलकापूर:- सर्वपित्री अमावस्या दिनांक 25 रविवार रोजी सकाळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्वात शासन प्रशासनाचे सर्वपित्री अमावस्याला तहसील कार्यालयाच्या गेट जवळ श्राद्ध घालून अनोखे आंदोलन करण्यात आले गरजू, गरजवंतांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ हा वेळेवर मिळत नाही. याबाबत अनेकदा निवेदने, आंदोलने करून देखील शासन, प्रशासनाला जाग येत नाही. तेव्हा शासन, प्रशासन जिवंत आहे की नाही? असा सवाल उपस्थित करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्वात शासन, प्रशासनाचे सर्वपित्री अमावस्याला तहसील कार्यालयाच्या गेटजवळ श्राध्द घालून अनोखे आंदोलन करण्यात आले व निषेध नोंदविण्यात आला.शासनाच्या वतीने गरजू, गरजवंत व गोरगरीबांसाठी तसेच शेतकऱ्यांकरीता अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून त्यांना महिन्याला मानधन दिले जाते. मात्र येणारे मानधन हे वेळेवर येत नसल्याने अशा लाभार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, अंपगांच्या रेशनकार्डचा प्रश्न तसेच आदी प्रश्न असतांना शासन,प्रशासनातील जबाबदार मात्र या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आहेत. तर गेल्या कित्येक महिन्यापासून या योजनांच्या केसेस पेंडीग पडल्या आहेत. त्यामुळे गरजुंना या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तसेच गेल्या काही महिन्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांवर ओढवलले संकट पाहता ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. मात्र याकडेही जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.याबाबत अनेकदा शासन, प्रशासन स्तरावर निवेदने देवूनही याचा कुठलाच उपयोग झाला नाही. तेव्हा या झोपलेल्यांना जागे करण्यासाठी आंदोलनांचाही मार्ग अवलंबून बघितला तरीही कुठलाच परिणाम होत नसल्याने शासन, प्रशासन जिवंत आहे की नाही? असा प्रश्न पडत असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयाच्या गेट जवळ पान पुंजून श्राद्ध घालीत अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्यासह तालुकाप्रमुख अजित फुंदे ,शहर युवा अध्यक्ष संतोष जाधव ,अपंग तालुकाप्रमुख राहुल तायडे ,शहर उपप्रमुख उमेश जाधव ,हेमंत जगताप, विजय पाथरकर, देविदास बोंबटकर, शितलताई जांगडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
प्रहार ने घातले शासन - प्रशासनाचे श्राद्ध ...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق