विशेष प्रतिनिधी
जळगाव(खा): अखिल भारतीय कुणबी महासंघाचे 'अधिवेशन' जळगाव खान्देश जिल्ह्यामध्ये बळीराजा मंगल कार्यालय जामठी रोड बोदवड, तालुका बोदवड येथे 2 ऑक्टोंबर, रविवार रोजी सकाळी 11:30 वाजता, येथे होणार आहे. या अधिवेशनाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शिवा पाटील गोंड, उपाध्यक्ष मा ज्ञानेश्वरजी भगत, संजयजी मांजरे, अखिल भारतीय कुणबी युवक महासंघ चे प्रदेशाध्यक्ष मा राहुलजी भुसारी, प्रदेश सचिव प्रवीणजी कान्हे, गोपाल गोलाईत, बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील टप, जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन गावंडे, अकोला जिल्हाध्यक्ष अजय वाघ, गणेशराव तिव्हाणे. यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रदेश आणि केंद्रीय कार्यकारिणीचे बरेचसे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांमध्ये अ भा कुणबी महासंघाच्या अंतर्गत चालवण्यात येणारे अखिल भारतीय कुणबी मराठा वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लग्न जुळलेली आहेत या मंडळाची ख्याती संपूर्ण राज्यामध्ये कुणबी मराठा समाजामध्ये नावलौकिक आहे, तसेच वधू वर सूचक मंडळाचे काम करण्याकरता तसेच संघटना वाढीबद्दल विविध उपक्रम चालवण्याकरता सेवाभावाने जे समाजातील लोक पुढे येतील त्यांना नवीन पदनियुक्ती देण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये कोण कोणते कार्यक्रम राबवण्यात येतील आणि कार्यक्रमांची वेळ सर्वानुमते निश्चित करण्यात येईल, तरी ज्या समाज बांधवांना सामाजिक कार्याची आवड असेल त्यांनी आपलं योगदान तसेच उपस्थित राहून पदभार स्वीकारावा आणि समाजाचे राष्ट्रीय नेते आपल्या बोदवड शहरामध्ये येत असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आव्हान बोदवड तालुका अध्यक्ष श्री समाधान बोरसे, जिल्हा संपर्कप्रमुख जगन्नाथ शेळके, बोदवड तालुका उपाध्यक्ष गजानन बिलोरे, निलेशजी ठाकरे, प्रसिद्धीप्रमुख संजय जाधव, बबनराव सोनवणे, सोशल मीडिया जळगाव जिल्हाध्यक्ष श्री अमोल पाटील ढेकळे, भुसावळ तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर वायके यांनी केले अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
إرسال تعليق