प्रतिनिधी:- योगेश काजळे
गटविकास अधिकारी होळकर साहेब यांच्यासह बांधकाम अभियंता मोरे साहेब लक्ष देतील काय?
मलकापूर तालुक्यातील महसुली व राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या वाकोडी ग्रामपंचायतचा आणखी एक प्रताप समोर येत आहे वाकोडी गावामधील सामाजिक सभागृहासमोर अंदाजे दोन लाख 22 हजार रुपये खर्च करून ग्रामपंचायतच्या जनरल फंडातून ओटयाचे बांधकाम चालू आहे सदर बांधकाम करताना बनवण्यात आलेले अंदाजपत्रक हे अतिशय चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आले आहे सदर ओट्याच्या पूर्व पश्चिम बाजूला कुठेही कॉलम किंवा बीम न करता फक्त मुरूम टाकून त्यावर काँक्रिट चां थर टाकण्याचे अंदाजपत्रक बनवल्या गेले आहे जर बांधकामाचा पायाच कमकुवत असेल तर भविष्यात हे बांधकाम नक्कीच टिकणार नाही त्यामुळे सदर बांधकामाचे अंदाजपत्रक पुन्हा नव्याने बनवून सदर ओटा बांधकामाच्या तिन्ही बाजूला बिम व कॉलम सह नवीन अंदाजपत्रक तयार करावे जेणेकरून ग्रामपंचायत प्रशासनाने चालवलेला खर्च सार्थकी लागेल अशी अपेक्षा गावातील सर्व नागरिकांना आहे
सदर कामाबद्दल बांधकाम अभियंता श्री मोरे साहेब यांना आमचे प्रतिनिधी भेटले असता व नंतर फोनवर चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की सदरचे काम थांबविण्यात आले आहे परंतु सद्यस्थितीत सदर काम हे चालूच आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या कामाविषयी जनभावनांचा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार पंचायत समिती प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासन राहील एवढे मात्र निश्चित
إرسال تعليق