मलकापूर:-( वडोदा) मागील कित्येक दिवसापासून वडोदा शिवरतालील प्रलंबित असलेला सिंगल फेज लाईट चा प्रश्न आज स्वाभिमानी मुळे मार्गस्थ. महावितरण अधिकार्यांना वेळोवेळी मागणी करुण पण संपूर्ण काम होऊन ही फक्त तांत्रिक परवानगी साठी सलग 1 वर्षांपासून शेतकरी सिंगल फेज पासून वंचित होते.आज संतप्त शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी याच्या रोषाला महावितरण कार्यालयाला झुकावे लागले. जो पर्यंत सिंगल फेज लाईट मिळत नाही तो पर्यंत कार्यालय सोडणार नाही .असा निर्धार केला. वेळे प्रसंगी कार्यालय पेटून देऊ असा इशाराच देण्यात आला
वडोदा शिवारातिल रात्रिची सिंगल फेज लाईट दोन दिवसात सुरु करण्याचे अभियंता मिश्रा साहेबांनी लेखी आश्वासन दिले व तात्पुरते अंदोलन स्थगित करा असे आव्हान केले हे अंदोलन स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृवात करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन शिंगोटे, विधानसभा प्रमुख विवेक दादा पाटील, तालुका युवा अध्यक्ष गणेश गायकवाड, युवा तालुका उपाध्यक्ष अक्षय भगत, विष्णु भोलवनकर, योगेश सूरडकर, शेख दाऊद, शिरसोडी ग्रा.प.सदस्य अरुण नारखेडे, महादेव घाइट, नीना नाफडे, विशाल मूरहेकर, शुभम नाफडे,मोहन भोलवनकर व इतर कार्यकर्ते हजर होते.
إرسال تعليق