Hanuman Sena News

मुस्लिम तरुणाची गणपती नेण्यासाठी मोफत रिक्षा सेवा...

(वडणगे) कोल्हापूर:- कोल्हापूर शहरात मुस्लिम कुटुंबातील रिक्षाचालक इरफान किल्लेदार यांनी दिनांक 31 ऑगस्टला गणरायाचे आगमन असल्यामुळे दिवसभरात तब्बल 63 गणेश भक्तांची गणेश मूर्ती आणण्यासाठी आपल्या रिक्षातून मोफत घरपोच सेवा दिली इरफान हे गेले पाच वर्षापासून आपल्या रिक्षातून गणेश भक्तांना गणपती मूर्ती घरपोच ही सेवा देत आहेत यंदाच्या वर्षीही त्यांनी गणेश भक्तांना ही सेवा केली केवळ आपण समाजाचे काही देणे लागतो हा एकमेव उद्देश ठेवून आपल्या जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजसेवेचा वसा घेत श्री गणेशाच्या श्रद्धेपोटी आपण ही सेवा देत असल्याचे इरफान किल्लेदार यांनी सांगितले  हे कार्य करीत असताना अशावेळी भाविकांचा आनंद लहान मुलांची हाऊस व सर्व पाहण्यासारखा असतो वडील समान व्यक्तींचा लाखमोलांचा आशीर्वाद या सेवेमुळे मिळतो यातच मी समाधानी आहे तसेच यापुढे सातत्याने ही मोफत सेवा देण्याचे व्रत कायम ठेवणार असल्याचे इरफान किल्लेदार यांनी सांगितले

Post a Comment

أحدث أقدم