Hanuman Sena News

दिव्यांग युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास...

बुलढाणा : दिव्यांग युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. एन. मेहरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील एकास आजन्म कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. देऊळगाव राजा पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या एका गावात २१ वर्षीय दिव्यांग युवती ही घरी एकटीच असताना आरोपी दिलीप संपत भालेराव (रा. निमगाव गुरू) याने पीडितेवर अत्याचार केला. तिची आई मजुरीच्या कामाने बाहेर गेलेली असताना आरोपीने ही संधी साधत अत्याचार केला होता. १८ जुलै २०२१ रोजी ही घटना घडली होती. दुपारी चार वाजता पीडित दिव्यांग मुलीची आई शेतातून घरी परत आली असता आरोपी हा पीडितेच्या बाथरूममध्ये गेला असल्याची माहिती पीडितेच्या आईला तिच्या नातेवाईकांकडून मिळाली. तेव्हा त्वरित घरी जाऊन त्यांनी पहाले असता आरोपी दिलीप संपत भालेराव पीडितेवर अतिप्रसंग करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी दिलीप भालेराव याने तेथून पळ काढला. सायंकाळ झाल्यामुळे त्या दिवशी या घटनेची पोलिसात तक्रार देता आली नाही. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या आईने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाअंती न्यायालयत दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात दिव्यांगतेच्या संदर्भाने वैद्यकीय अधिकारी, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुशील चव्हआम, मानसिक विकलांगतेच्या अनुषंगाने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पाटोळे, डॉ. किरण रगडे, पंचसाक्षीदार संतोष सरकटे व पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे यांच्या साक्षी सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरल्या. वादी पक्षाच्या वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांचा प्रभावी युक्तीवाद पहाता जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन मेहरी यांनी आरोपी दिलीप संपत भालेराव यास दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हा जन्म कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा 29 ऑगस्ट रोजी सोनवणे या प्रकरणात वादी पक्षाचा विशेष सरकारी वकील तथा अतिरिक्त सरकारी अभियंता एडवोकेट सोनाली सावजी यांना कोर्ट भैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सावळे यांनी सहकार्य केले त दिव्यांग असल्याने नोंदविला नाही जबाब प्रकरणातील पिढीतही शंभर टक्के दिव्यांग असल्याने जबाब देणे असती सक्षम नसल्याने तिचा जबाब नोंदविण्यात आला नाही सोबतच या प्रकरणातील दोन प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या महिलांनी वेळेवर साक्ष फिरवलेली असताना प्रीतीची आई वैद्यकीय अहवाल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष घटनेला पूरक व सुसंगत तथा विश्वास सहकार्य असल्याने तथा सरकारी वकील एडवोकेट सोनाली सावजी यांनी प्रभावी युक्तिवाद पहात वैद्यकीय अधिकारी यांचा पुरावा देखील न्यायालयाने नोंदविला होता

Post a Comment

أحدث أقدم