Hanuman Sena News

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधम शिक्षकास अटक...


अमडापूर (बुलडाणा) : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकास अमडापूर पाेलिसांनी २८ ऑगस्ट राेजी अटक केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. जगदीश पठाडे असे आराेपी शिक्षकाचे नाव आहे.चिखली तालुक्यातील धानोरी येथील जि.प. शाळेवर कार्यरत असलेल्या जगदीश पठाडे याने ८ वर्षीय बालिकेला कार्यालयात बाेलावून तिचा लैंगिक छळ केला हाेता. ही घटना २८ जुलै २०२२ राेजी घडली हाेती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने २८ ऑगस्ट राेजी फिर्याद दिली हाेती़ या फिर्यादीवरून अमडापूर पाेलिसांनी आराेपी शिक्षकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर रात्री उशीरा अमडापूर पाेलिसांनी आराेपी जगदीश पठाडे यास अटक केली़   पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नागेश चतरकर व दुय्यम ठाणेदार पांडुरंग शिंदे हे करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم