Hanuman Sena News

पिंपळनेरला एमआयडीसी सहा महिन्यांत उभी राहणारच... मंत्री उदय सामंत

पिंपळनेर (ता. साक्री ) :-  ग्रामपंचायत आणि इतर निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने विश्वास ठेवला आहे संपूर्ण महाराष्ट्र सोबत असलेल्या दिसत असतानाच काही जण आम्हाला गद्दार म्हणून हिणवतात त्यांनी आजची गर्दी पहावी मग कळेल गद्दार कोण आहे जनता आमच्या सोबत असल्याने आम्ही टीकेला घाबरत नाही भविष्यात 100 आमदार आपलेच असतील असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला पिंपळनेर (ता. साक्री) दौऱ्यावर त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री उदय सावंत म्हणाले की आमदार मंजुळाताई गावित यांनी देखील विकासासाठी धाडसी निर्णय घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला पुरुष आमदारावर होणारी टीका मी समजू शकतो मात्र महिलांवर देखील खालच्या स्तरावर टीका झाली जनता यांचा बदला घेईल असे यावेळी सांगितले सहा महिन्याच्या आत पिंपळनेरला एमआयडीसी उभी राहणारच येथील व्यापाऱ्यांनी माझ्याकडे औद्योगिक वसाहती मागणी केली आहे मी शब्द देतो येत्या सहा महिन्यात पिंपळनेरला एमआयडीसी उभी राहणारच साक्री च्या आमदार तुमच्या विकासासाठी झटत आहे चांगल्या प्रकारे काम करीत आहे त्यामुळे संपूर्ण मतदार संघाने त्यांच्या मागे आपली शक्ती उभी करावी असे आवाहनही उदय सामंत यांनी केले मंत्री सामंत यांचे साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावीत यांनी स्वागत केले यावेळी खुल्या वाहनातून त्यांची पिंपळनेर- सटाणा महामार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, संचालक, वि. का. सोसायटी, संचालक आधी या मिरवणुकीत सहभागी झाले होते तसेच असंख्य शिंदे गटातील कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم