गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला आहे त्यामुळे घरोघरी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे सार्वजनिक मंडळ ही सज्ज झाले आहेत मलकापूर शहरातील बाजारात गणपती बाप्पांच्या मूर्ती व सजावटीच्या विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे मागील दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे गणेश उत्सव सणावर सरकारने निर्बंध घातले होते मात्र यावर्षी निर्बंध उठवल्यामुळे नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहे सर्वांनी तयारी सुरू केली आहे मात्र महागाईचा आर्थिक ताण भाविकांना सहन करावा लागणार आहे बाजारामध्ये फुलाची कमान, हार, मोत्यांच्या माळा, झेंडू सह विविध फुलांचे आणि पानांचे हार, लाइटिंग ,विविध साहित्य विक्रीसाठी आलेले आहे सुट्टीचा बेत आखून भाविक खरेदीसाठी बाजारात जात आहे मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी २० ते २५ टक्क्यांनी प्रत्येक साहित्य मध्ये वाढ झालेली दिसून येत आहेत शहरातील प्रत्येक चौकामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती व शोभेच्या वस्तू दुकानदारांनी आपल्या दुकानात उपलब्ध करून ठेवले आहेत नैसर्गिक वाटावी अशी लहान सभेची फुले भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत खास मोत्यांचे लटकन ,मोत्यांचे तोरण, पुष्पगुच्छ, गोल्डन लटकन, सोबत मनी लटकन यांची प्रचंड प्रमाणात विक्री होत आहे तसेच सार्वजनिक मंडळ ही सज्ज झालेले आहे यावर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने हटवले आहेत त्यामुळे सार्वजनिक मंडळानेही आता जोमात तयारी सुरू केली आहे विविध परवानगी तसेच वर्गणी गोळा करण्याकडे लक्ष केंद्रित केले जात आहे गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या विविध शोभेच्या वस्तू व माळांनी बाजारपेठ सध्या सजली आहे मात्र महागाई वाढल्याने त्याचा फटका सर्व सामान्य जनतेला बसला आहे
बाप्पाच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरू भाविकांची खरेदीसाठी गर्दी...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق