मुंबई:- राज्यात पोलीस भरती लवकरच 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली विधानसभेत लक्ष विधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच आणखी 7000 पोलिसांची भरती केली जाणार आहे त्याबाबतची सूचना लवकरच देण्यात येईल नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे एका अधिकाऱ्यास एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये याबाबत दक्षता घेतली जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
राज्यात पोलीस भरती लवकरच... उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस
Hanuman Sena News
0
إرسال تعليق