Hanuman Sena News

स्वातंत्र्यदिनानिमित्त अंश ठोसर नी, धारण केला पोलिसांचा गणवेश; हट्ट करून पोलीस अधिकाऱ्यांसोबत काढले फोटो

  


मलकापूर

देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. सरकारच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देश भर साजरा केला जात आहे या अनुषंगाने आज दि. 15 ऑगस्ट रोजी मलकापूर शहरातील नूतन इंग्लिश स्कूल येथे मोठ्या उत्साहात स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.

       नूतन इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, सैनिक, पोलीस अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले होते. अश्या स्वातंत्र्य सैनिकांचे वेशभूषा धारण करून ध्वजारोहण मोठा उत्साहात साजरा केला. दरम्यान ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर चिमुकल्यांनी आई-वडिलांसोबत घराची वाट पकडली व घराकडे रस्त्याने जाऊ लागले असता अंश संदीप ठोसर वय 6 वर्ष या चिमुकल्या ने पोलिसांचा पोषाख धारण केला होता. हा पोशाख धारण करून जणू त्याला पोलीस झाल्यासारखे वाटले त्यामुळे त्याने रस्त्याने आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी यांच्यासोबत फोटो काढले व त्याने पोलिसांसोबत गप्पा मारताना मला तुमच्या सारखा पोलीस दादा व्हायचे आहे अशा भावना सहा वर्षाच्या चिमुमल्या अंश नी व्यक्त केल्या हे ऐकून पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांचे कौतुक वाटले. अंश नी अशा भावनेतून पोलीस अधिकाऱ्यांचे मन जिंकले. मार्गावर जो कोणी पोलीस अधिकारी दिसेल त्यासोबत अंश आई-वडिलांसोबत हट्ट करून फोटो काढत गेला.

Post a Comment

أحدث أقدم