Hanuman Sena News

गोजिरी हॉस्पिटलच्या शौचालयात आढळले स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक...

मलकापूर :- 
शहरात गोजिरी हॉस्पिटलच्या शौचालयात आढळले स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक मलकापूर चाळीसबिघा परिसरात गोजिरी हॉस्पिटलच्या शौचालयात स्त्री जातीचे मृत अर्भक दिसून येताच संबंधीत माहिती शहर पोलीस स्टेशनमध्ये सांगितली असून याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहे सदर स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आणून टाकले या प्रकरणी गोजिरी हॉस्पिटलचे संचालक प्रफुल पाटील यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तोंडी माहिती दिली असून मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपराध क्रमांक ३६३, २०२२,कलम ३१८भां.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरेश रोकडे व मुंडे करीत आहेत

Post a Comment

أحدث أقدم