Hanuman Sena News

दोन-तीन वर्ष उलटूनही वडोदा गावातील लोकांना रेशन धान्य पासुन वंचित रहावे लागते...शिवसेने तर्फे निवेदन

 मलकापूर तालुक्यातील वडोदा गावामध्ये दोन-तीन वर्षापासून नवीन काढलेले रेशन कार्ड धारकांना अजूनही धान्य मिळत नाही तसेच काही रेशन कार्ड मध्ये नाव समावेश केल्यानंतरही त्यांना सुद्धा दोन-तीन वर्षापासून धान्य मिळत नाही त्यामुळे आज तहसील कार्यालयावर बडोदा गावातील नागरिक यांनी मोर्चा काढून मलकापूर तहसीलदार साहेबांना निवेदन दिले.निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दोन-तीन वर्षापासून नवीन रेशन कार्डधारकांना अजूनही धान्य दिले जात नाही नवीन नाव त्या रेशन कार्ड मध्ये टाकून सुद्धा त्यांना रेशन कार्डावर धान्य दिले जात नाही कार्यालयातील रेशन विभागांमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे, विभक्त रेशन कार्ड काढणे,नविन नाव समाविष्ट करणे ,सदर बाबी ऑनलाईन हातोहात RC नंबर दिल्या जात नाही व  हातोहात सदर नाव समावेश नावे ऑनलाइन करून देण्यास आपल्यास स्तरावरून आदेशित करण्यात यावे  दोन-तीन वर्षापासून नवीन काढलेले नाव रेशन धारकांना लवकरात लवकर धन्य देण्यात यावे ही गावकऱ्यांची मागणी तहसीलदार साहेबांना दिले त्यावेळी राजेश सिंह राजपूत, राम थोरबोले ,रामराव तळेकर, संतोष खोडके, आकाश बोरले ,महादेव पवार ,विठ्ठल जगदाळे, संजय तळेकर, बाबुराव तायडे, शेख ईसा शेख बिस्मिल्ला, शांताराम तायडे, व अन्य गावकरी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم