प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक पथकाने सापळा रचून तब्बल २६ लाख रुपयांचा सुंगधीत गुटखा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. यात वाहनासह तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध गुटखा माफीयांचे धाबे दणाणले अपर पोलीस अधीक्षक पथकानी पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांना जळगाव खान्देश येथून लोणार येथे एका ट्रकमधून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक पथकाने लोणार फाटा मेहकर येथे नाकाबंदी करुन ट्रक पकडला. या ट्रकची झडती घेतली असता त्यात २५ लाख ६३ हजार २०० रुपयांचा सुगंधी गुटखा, पान मसाल्याचा साठा आढळला. पोलिसांनी अवैध गुटखा आणि वाहन असा एकूण ४०,९५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार दोन्ही रा. जळगाव खान्देश, गजानन मापारी रा. लोणार यांच्या विरुद्ध मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या नेतृत्वात पोउपनी पंकज सपकाळे आणि अपर पोलीस अधीक्षक पथकाने ही कारवाई कली
२६ लाख रुपयांचा गुटखा पकडताच अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق