**
विशेष प्रतिनिधी:- योगेश काजळे
जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले , देव तेथे सी पहावा देव तोच ओळखावा या काव्यपंक्तीप्रमाणे आज मलकापूर शहरामध्ये हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल भाऊ टप, नानाभाऊ येशी व त्यांचे असंख्य सहकारी यांनी 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या तत्वाला अनुसरून मलकापूर शहरामध्ये जे सामाजिक कार्य चालू केले आहे हे नक्कीच प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे कुठेही राजकीय पार्श्वभूमी नसताना व कुठलेच आर्थिक पाठबळ नसताना फक्त समाजसेवेचा ध्यास घेऊन हनुमान सेनेच्या माध्यमातून जे समाजकार्य चालू झाले आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे
आज हनुमान सेनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जवळपास 30 ते 40 बेरोजगार युवक रोजगार लागलेले आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हनुमान सेनेच्या माध्यमातून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य हनुमान सेनेने केलेले आहे आज मलकापूर शहरांमध्ये कुणालाही दवाखान्यामध्ये रक्ताची गरज भासल्यास सर्वांच्या तोंडावर फक्त एकच नाव येते ते म्हणजे हनुमान सेना समोरील व्यक्ती कोणीही जाती धर्माचा असो त्याला कितीही अर्जंट रक्ताची गरज असो हनुमान सेना संपर्क कार्यालयात फोन येताच त्यांना आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रक्त उपलब्ध करून दिल्या जाते याची अनेक उदाहरणे तालुक्यात बघायला मिळतात हनुमान सेनेचे समाजकार्य असेच निरंतर चालू राहो व त्यांच्या कार्याला नेहमीच ईश्वर सद्गती देवो अशी प्रार्थना सामान्य नागरिकांकडून नेहमी केली जाते
إرسال تعليق