Hanuman Sena News

पुनर्वसन च्या नावाखाली आजही देव्हारी गाव विकासाच्या प्रतीक्षेत...

बुलढाणा जिल्ह्यातील देव्हारी गावचे पुनवर्सन काही वर्षापासून रखडले आहे तसेच विकासकामे ठप्प झाले व गावकरी त्रस्त आहेत देव्हारी गाव ज्ञानगंगा अभयारण्यात आहे. या गावाचे पुनर्वसन होणार आहे. त्यामुळे गावात कोणतेही विकासकामे करण्यात येत नाही गावातील नागरिकांना वन्य प्राण्यांच्या दहशतीत जगावे लागत आहे. गावाच्या शेतशिवारात अनेकदा बिबट्या, लांडगे,अस्वलसारखे हिंस्त्र पशू फिरत असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.देव्हारी गाव ज्ञानगंगा अभयारण्यात आहे.गावातील रस्ते, नालीच्या अनेक समस्या आहेत. गावात जाण्याकरिता रस्ता नाही. त्यामुळे गावकऱ्यांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. एकीकडे पुनर्वसन होत असल्याने गावात विकासकामे करण्यात येत नाही तर दुसरीकडे गावाचे पुनर्वसनही करण्यात येत नाही. त्यामुळे गावकरी अडचणीत सापडले आहेत. गाव अभयारण्यात असल्याने वारंवार बिबट्या, लांडगे,अस्वलसारख्या हिंस्त्र पशूंचा गावकऱ्यांना सामना करावा लागतो. आतापर्यंत गेल्या दोन वर्षात ३०ते ३५ शेतकऱ्यांची पिके वन्यप्राण्यांनी नष्ट केली. तसेच काही जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जीव धोक्यात टाकून पिकांचे रक्षण करावे लागते परिसरात रानडुकरांसह, नीलगाय, हरीण व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. बरेच शेतकरी जीव मुठीत धरून धोक्याचे जिवन जगत आहे व आपल्या पिकांची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वन्यप्राण्यांमुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.गावाचे पुनर्वसन त्वरीत करणे गरजेचे आहे गावातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे वन्य प्राणी पिकांचे नुकसान करतात तसेच ग्रामस्थांच्याही जीवाला धोका आहे त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सरकारने पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित सोडवावा अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे

Post a Comment

أحدث أقدم