शिर्डी येथील साई समाधी मंदिरात हार-फुले नेण्यास गेल्या दहा महिन्यांपासून बंदी करण्यात आली आहे. या विरोधात भाविक, स्थानिक ग्रामस्थ आणि हार-फुले विक्रेत्यांनी शुक्रवारी आक्रमक होत आंदोलन केले. फुले घेऊन मंदिरात निघालेल्या विक्रेत्यांना पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी अडविले. त्यावेळी प्रवेशद्वारावरच त्यांच्यात झटापट झाली. आता या विषयावर चर्चा सुरू झाली असून बंदीचा निर्णयाला विरोध सुरू झाला आहे.मानवी हक्क क्षेत्रात काम करणारे पुण्यातील वकील असीम सरोदे यांनीही यावरून टीका केली आहे. श्रीमतांनी दिलेले सोन्याचे दागिने चालतात, मग गरीबांची फुले का नकोत? असा प्रश्न करून सरोदे यांनी म्हटले आहे की, हा भेदभाव थांबवा. साईबाबा दरिद्रीनारायणाचे होते हे विसरू नका, अशी आठवण त्यांनी करुन दिली.गेल्या दहा महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या आंदोलनामुळे प्रकरण चिघळले आणि राज्यभर त्याची चर्चा सुरू झाली. मानवी हक्क क्षेत्रात काम करणारे वकील असीम सरोदे यांनीही याची दखल घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे, शिर्डीच्या मंदिरात फुलं, हार-तुरे सगळे नेण्याची परवानगी असली पाहिजे.माणसांची पोटं भरण्यासाठी जेथे देवाचा उपयोग होतो त्याच मंदिर-मस्जिद व दर्ग्यांचे महत्त्व आहे. शिर्डीच्या मंदिरात फुलं, हार-तुरे नेण्याबाबत साईबाबा संस्थानचा काय नियम असेल तो बदलावा कारण अनेकांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न आहे. भुकेच्या देवाचा मंदिरातील देवाशी असलेला संबंध तोडणे अमानुष आहे. श्रीमंतांनी दिलेल्या हिऱ्यांच्या राशी चालतात, सोन्या-चांदीचे, माणिक-मोत्यांचे मुकूट व हार आत नेऊन देवाला अर्पण केलेले चालतात व गरिबांची हार-फुले चालत नाही हा भेदभाव थांबवा. साईबाबा दरिद्री नारायणाचे होते हे विसरू नका अशी आठवण करून दिली जर संस्थांनी निर्णय बदलला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा भाविक, स्थानिक ग्रामस्थ, हार फुले विक्रेत्यांनी दिला
श्रीमंतांनी दिलेल्या सोन्याचे दागिने चालतात मग गरिबांची फुले का नकोत ?....
Hanuman Sena News
0
إرسال تعليق