Hanuman Sena News

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्यां विधानाने शिंदे गटांतील आमदार व खासदार नाराज....

 बुलढाणा  :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताचा विश्वगुरु बनण्याचा प्रवास सुरू असून त्यांचे व्हिजन भारताला जागतिक उंचीवर नेणार आहे. नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार भाजपाच्या कमळ चिन्हावरचा द्यावा लागेल, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी केल्याने शिवसेनेतील बंडखोर आणि शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची धाकधूक वाढली आहे. जाधवांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.भाजपाने आतापासूनच 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्या असून महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघांसाठी दिल्लीतील नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्षसंघटना मजबुत करण्यावर भर देत आहेत.
बावनकुळे बुलढाणा जिल्ह्यात आले असताना शहर भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली.या बैठकीत बावनकुळे यांनी केलेल्या वरील विधानाने शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव याची धाकधुक वाढली आहे.बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे आपण उमेदवार असणार असे
जाधव यांना वाटत असतानाच बावनकुळे यांच्या वक्तव्याने त्यांची चिंता वाढवली आहे.

Post a Comment

أحدث أقدم