Hanuman Sena News

मलकापूर एसटी महामंडळाच्या आगारातील खड्ड्यांना अखेर समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष अशांतभाईं वानखेडे यांनी स्वखर्चातून केली मदत....

मलकापूर:- मलकापूर बसस्थानक परिसरात पडलेल्या खड्ड्यामध्ये रोजच्या रोज छोटे-मोठे अपघात होत होते या अपघाताच्या बातम्या सर्वच न्यूज पेपर ला प्रसिद्ध होत असून सुद्धा प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत होते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेताच समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक अशांतभाई वानखडे यांनी स्वखर्चाने बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजऊन बस चालक व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर केला. गेल्या सहा महिन्यांपासून बस स्थानक परिसरात पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे बस चालकास व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. या अपघाती खड्ड्या बाबत वारंवार महामंडळ प्रशासनाला विचारणा केली असता महामंडळ प्रशासनाकडून योग्य ते उत्तर मिळत नसे, पत्रव्यवहार केला आहे,निधी उपलब्ध होत नाही असे वेळोवेळी सांगण्यात येत होते. महामंडळ प्रशासन जीवघेणे खड्डे बुजण्यात असमर्थ आहे या सर्व घटनेची माहिती व विद्यार्थ्यांना होणारा त्रास तसेच पावसाच्या पाण्याने पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारे अपघात माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांना माहिती मिळाली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघाती खड्ड्यांची पाहणी करून ताबडतोब स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजले. यावेळी उपस्थित मलकापूर आगाराचे प्रमुख दादाराव दराडे यांनी अशांतभाई वानखडे यांचे मनःपूर्वक आभार मानले व बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या समस्यां बाबत चर्चा केली.

Post a Comment

أحدث أقدم