Hanuman Sena News

वीज पडून दोघांचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी जळगाव जामोद तालुक्यातील घटना*

*विशेष प्रतिनिधी- योगेश काजळे

जळगाव जामोद तालुक्यातील निम कराड येथील अमोल रघुनाथ पिसे, मधुकर तुळशीराम उगले व त्यांच्या पत्नी यमुना मधुकर उगले हे काल शेतात काम करत असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला पावसापासून बचाव करण्यासाठी तिघेही शेतातील झाडाखाली एकत्र आले मात्र झाडावरच वीज पडल्याने अमोल रघुनाथ पिसे व मधुकर उगले यांचा जागीच मृत्यू झाला तर यमुनाबाई उगले ह्या गंभीर जखमी झाल्या जखमी यमुनाबाई उगले यांच्यावर उपचार चालू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत असते परंतु या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा घटना नेहमी घडत असतात त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना कोणीही झाडाखाली उभे राहू नये असे आवाहन प्रशासनातर्फे केले गेले आहे

Post a Comment

أحدث أقدم