Hanuman Sena News

ऑटो चालकाचा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला...

खामगाव: तक्रार देण्याच्या कारणावरून एका अनोळखी ऑटो चालकाने २२ वर्षीय युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही घटना तालुक्यातील कोलोरी येथे घडली. याप्रकरणी अनोळखी ऑटो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खामगाव तालुक्यातील कोलोरी येथे रणजीत राजू खंडारे हा युवक अंगणात झोपला होता. बुधवारी पहाटे साडेतीन- चार वाजताच्या दरम्यान त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला झाला. काही समजण्याच्या आतच हल्लेखोर ऑटोतून पसार झाला. दरम्यान, जखमी अवस्थेत त्याला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले.  रणजीतच्या  तक्रारीवरून अनोळखी आॅटो चालकाविरोधात भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم