स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील 5 कोटी महिलांना मोफत घरगुती एल.पी.जी. गॅस उपलब्ध करुन दिल्यामुळे महिलांच्या चेह-यावर हास्य फुलले आहे. ग्रामीण भागात पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर झालेच त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती. परंतु या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरापर्यत एल.पी.जी. सिलेंडर पोहचले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही योजना राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे घराघरापर्यत पोहचली आहे. त्या अंतर्गत मलकापुरातील देवधाबा येथे उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन वाटप यापूर्वीही करण्यात आले असून रविवारला सुद्धा रचना गॅस एजन्सीचे मलकापूर संचालक श्री मनीष भाऊ लखानी यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती गावकऱ्यांना दिली .त्यांच्या हस्ते सर्व लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी सरपंच सुरेश सुरंगे, चंद्रकांत कवडे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर फुफसे, निलेश सुरंगे ,अशोक बोरसे, विनोद सावळे, गजानन ढगे, नामदेव शिर्के, विनोद गोराडे, निलेश बोरसे, विजय मंडवाले, दादाराव डुबले, किसन घाटे ,संजय कावळकर व लाभार्थी गावकरी महिलांची यावेळी उपस्थिती होती
मलकापूर देवधाबा येथे उज्वला गॅस योजनेचे कनेक्शन वाटप...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق