Hanuman Sena News

नियमित वेळेवर बस येत नसल्याने भाजपा युवा मोर्चा व हनुमान सेना पदाधिकाऱ्यांनी आगर व्यवस्थापकाला घातला घेराव



वाघोळा येथील विद्यार्थी दसरखेड, धरणगाव, मलकापूर येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात पण विद्यार्थ्यांसाठी बस नियमित वेळेवर येत नसल्यामुळे शाळेत विद्यार्थी वेळेवर व संध्याकाळी घरी पोहोचण्यास वेळ लागतो व काही वेळेस बस एक दोन तास लेट होते तेव्हा घराकडे जाण्यासाठी तीन चार किलोमीटर पायी प्रवास सुद्धा करावा लागतो होणारा त्रास विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नानाभाऊ येशी यांना भ्रमणध्वनीद्वारे सांगितले व नानाभाऊ येशी घटनास्थळी धाव घेऊन बस आगार व्यवस्थापक दराडे साहेब यांच्या लक्षात आणून दिला व बस नियमित येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर जो त्रास होत आहे याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आगार व्यवस्थापक दराडे साहेब यांनी बस नियमित वेळेवर येईल असे आश्वासन दिले यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी व वाघोळा येथील हनुमान सेनेचे अध्यक्ष अमोल मोरे ,रोहित कांडेलकर व असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी  उपस्थित होते*

Post a Comment

أحدث أقدم