मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर शहरातील माता महाकाली नगर येथील 17 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आदित्य महादेव बोरसे (वय 17) वर्ष राहणार माता महाकाली नगर. आई-वडील शेतात गेले असता घरी कोणी नसताना राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही बाब आई शेतातून घरी आल्यानंतर आईने दरवाजा उघडून बघितल्यानंतर हा प्रकार उघडीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पी एस आय सानप, पो. कॉ. शैलेश, पो. कॉ. मंगेश चालक हटकर दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करता उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे पाठवण्यात आला.
या घटनेचा प्राथमिक तपास पी एस आय सानप यांनी केला तर पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहेत. आदीत्य हा मनमिळाऊ स्वभावाचा होता त्याच्या अशा अचानक पणे निघून जाण्याने माता महाकाली परिसरात शोककळा पसरली. आई-वडिलांसाठी आदित्य हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या पश्चात आई-वडील आजी दोन बहिणी असा परिवार आहे.
إرسال تعليق