मलकापूर :- जम्मू कश्मीर मथील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून २२ एप्रिल रोजी मानवतेवर झालेल्या क्रूर हल्ल्या झाले त्यात 27 निर्दोष हिंदू बांधवांना त्यांचे धर्म विचारून त्यांना मारण्यात आले ही घटना मानतेला काळीक फासणारी आहे.हिंदू समाजातील दैवत भगवान परशुराम यांचे जन्मोत्सव 30 एप्रिल रोजी संपुर्ण देश भारत मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा केल्या जाते सकल ब्राह्मण समाजाचा सर्वात मोठा उत्सव भगवान परशुरामजी जन्मोत्सव असतो या अनुषंगाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मलकापूर तर्फे जन्मोत्सवा निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन झाले होते यात सकाळी गोरक्षण मध्ये गोमाता पूजन चारा वितरण, सकाळी 10 वाजता पर्यावरण पूरक सायकल रॅली, दुपारी 12 वाजता जन्मोत्सव शांतिपाठ, सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा,महाप्रसाद आयोजन झाले होते , पण अचानक झालेल्या मानवते वरील या हल्ल्याने संपूर्ण देश हा हादरून, शोकाकुल झालेला आहे. ब्राह्मण समाज हा नेहमी, देशभक्ती, संपूर्ण विश्वाला मानवतेचा व शांतीचा संदेश देणारा समाज असून हा समाज दिशादर्शक व धर्म ध्वजा हातात घेऊन हिंदुत्वाचा व सनातन धर्माचा मूलभूत पाया राहिलेला आहे,पहलगाम मधील या निर्दोष निहत्या 27 प्रवासी यांना त्यांचे धर्म विचारून हत्या केली ह्या कृत्याने सकल हिंदू समाजाचे मन दुखी झाले आहे आणि या करिता भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेणे, हे आपल्या समाजाच्या स्वभाव व गुणधर्मांशी विपरीत आहे. ही वेळ म्हणजे आपल्या संघटनात्मक विचारांची वङ्कामुठ तयार करून देश विघातक शक्तींवर, या माध्यमातून प्रहार करण्याची आहे, व हि वेळ या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आपल्या बांधवांना याद्वारे खरी श्रद्धांजली देण्याची आहे.या सर्व बाबींवर चिंतन व विचार करीत दरवर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ द्वारे आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव यावर्षीचा उत्सव हा जल्लोषात नव्हे तर मर्यादित स्वरूपात अक्षय तृतीया दिवशी दुपारी 12 वाजता ब्राह्मण सभा येथे जन्मोत्सव संस्कृतिक रित्या जन्मोत्सव आरतीचे आयोजन करून या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी झालेल्या 27 हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पित करणार आहे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांच्या आणि देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत व हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य सुध्दा आहे व या माध्यमातून आपण यांना भावपूर्ण आदरांजली देणार आहोत. तसेच दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सदगती प्राप्त होवो व या दुःखातून त्या परिवारांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो, अशी प्रार्थना करून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.
देशावर झालेल्या अमानवीय व क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भ.श्री.परशुराम जन्मोत्सव निमित्त ३० एप्रिल रोजी होणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द...
Hanuman Sena News
0
Post a Comment