बुलढाणा: दि. 19/4/25 विहिप बजरंग दल व सकल हिन्दू समाज द्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले. व वफ्फ बोर्ड विधेयक लोकसभेत व राज्यसभेत पारित झाले असून महामहीम राष्ट्रपती महोदय यांची मान्यता सुद्धा मिळाली असून प्रकरण सुप्रीमकोर्ट कडे गेले आहे,मुस्लिम या वफ्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचा विरोध करीत आहे व तो त्यांचा संवैधानिक अधिकार देखील आहे, परंतु बंगाल राज्यात आधीच मुखमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगाल मध्ये हा कायदा लागू न करण्याचे म्हटले असून येथील मुस्लिम याचा विरोध करताना हिंदूंना लक्ष करीत आहे त्यांच्या घरांना आगी लावणे, प्रतिष्ठान लुटणे,महिलांवर आत्याच्यार करणे इत्यादी निंदनीय प्रकार बंगाल राज्यात होत आहे, शांतता प्रस्तापित करणे हे राज्यसरकारचे काम असून या मध्ये ममता सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, हिंदूंचे पलायन तेथून होऊ लागले आहे,व हिन्दू स्वतःला असुरक्षित असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.तेंव्हा हे निष्क्रिय राज्य सरकार त्वरित बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या करिता आज हे निवेदन मा.महामाहीम महोदय राष्ट्रपती यांना पाठविण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना देण्यात आले.यावेळी विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल व सकल हिन्दू समाज पदाधिकरी कार्यकर्ते उपस्तित होते.
विहिप बजरंग दल व सकल हिंदू समाजा द्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन...
Hanuman Sena News
0
Post a Comment