मलकापूर : आज दि 8 मार्च शनिवार "जागतिक महिला दिन" जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जयश्रीताई खर्चे मलकापूर यांच्या लॅब मध्ये महिलांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान सोहळ्याचे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात केवळ महिलांनी रक्तदान केले. महिलांच्या उत्साही वातावरणात केवळ महिलाच रक्तदानासाठी रांगा लावतात व रक्तदान करतात, हा क्षण अनुभवण्यासारखा होता.रक्तदान शिबिरात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.हनुमान सेना मलकापूर सतत केवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते. हे रक्तदान शिबिर जयश्रीताई खर्चे मलकापूर यांच्या लॅबमध्ये दि. 8 मार्च शनिवार संध्या 5 ते 6 वा. या वेळेत घेण्यात आले महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित राहून, रक्तदान करण्यासाठी आवर्जून उपस्थिती दर्शवली यावेळी हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ टप,हनुमान सेना न्यूज चे संपादक नानाभाऊ येशी, प्रियाताई नारखेडे, स्वातीताई खर्चे, वैशालीताई खापोटे, हेमलताताई जगताप, जोशनाताई शिरसागर, वैशालीताई भोपळे, रोशनीताई परियानी, सुवर्णाताई पाटील, छायाताई चौधरी, आशाताई पाटील, मीनाताई पाटील इ. रक्तदान केले. अमोल पाटील, प्रवीण खर्चे उपस्थित होते
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी केले रक्तदान...
Hanuman Sena News
0
Post a Comment