Hanuman Sena News

स्वातीताई खर्चे यांची समाजाला संदेश देणारी गुढी ठरली कार्यक्रमाचे आकर्षण...


मलकापुर: हिंदू नववर्ष दिन गुढीपाडव्याच्या औचित्यावर रविवार (दि.30 ) विविध संस्थांतर्फे शोभायात्रा काढण्यात आल्या. ढोल लेझीम शंखनाथ झांज आणि भगव्या ध्वजासह पारंपरिक पोशाखात बांधवांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. काटदार फेटे,नाकात नथनी, नऊवारी साडी अशा मराठमोळ्या पोशाखातील महिलांचा सहभाग भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा दिवस ‘महापर्व’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीपाडव्यानिमित्त शहरात महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचा उद्देश मातृशक्तीला, स्त्रीशक्तीला वंदन करणे होता. त्यानिमित्ताने महिला वर्ग घराबाहेर पडून त्यांनी गुढीपाडवा जल्लोष साजरा केला.यावेळी मलकापूर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली.या गुढीपाडवा रॅलीचे मुख्य आकर्षण आणि जनतेच्या चर्चैचा विषय ठरली ती सौ.स्वातीताई खर्चे यांच्या बाईक वरील गुढी त्यात महिलांविषयी संदेश देऊन गुढी उभारली होती.  गुढी महिला शिक्षणाची, गुढी महिला स्वातंत्र्याची,एकजुटीची, आरोग्याची,त्यागाची समाजाला संदेश देणारी ही गुढी उभारण्यात आली होती सौ.स्वातीताई खर्चे  गुढीपाडवा रॅलीत भाग न घेता त्या रॅलीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर करून समाजाला संदेश देत असतात. त्या सामाजिक क्षेत्रात महिलांना रक्तदान करण्यासाठी उत्साही करत असतात, तसेच पर्यावरण राखण्यासाठी वृक्षारोपणाची मोहीम सुद्धा हाती घेत असतात, दीनदुबळ्यांना मदत करत असतात हि खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.विविध चळवळीत सहभागी होऊन सामाजिक कामाला हातभार लावण्याचे काम करत असतात अशा या स्त्रीशक्तीचा मलकापूर येथील सामाजिक संघटना हनुमान सेनेने गुणगौरव करून सन्मानित केलेले आहे. तसेच या कार्यक्रमाला मलकापूरचे भाजपाचे माननीय लोकप्रिय आमदार श्री चैनसुखजी संचेती विशेष उपस्थिती होती.तसेच चैतन्य केमिकलचे संचालक श्री. प्रसन्न देशपांडे आणि अनेक मान्यवर, जेष्ठ मंडळी उपस्थित होते.अतिशय आनंदाने आणि जोशात या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.श्रीराम प्रतिष्ठान आणि श्रीराम ढोल पथकच्या माध्यमातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post