शेकडो युवक-युवतींनी परिचय देत आयोजकांकडे परिचय पत्र केले सादर
मलकापूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय कुणबी मराठा वधू-वर सुचक मंडळ मलकापूर यांच्या वतीने आज २३ मार्च रोजी उपवर युवक-युवती व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन स्थानिक मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.या आयोजित परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शिवा पाटील गोंंडे हे होते. तर उद्घाटक म्हणून अॅड.साहेबराव मोरे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथीमध्ये विनोद सोनवणे, राजाभाऊ कर्हाळे, बी.सी.महाजन, प्रविण काने, मनोज सोनुने, ज्ञानेश्वर भगत, किसन कंकाळे, सौ.मंगलाताई श्रीकृष्ण पाटील, राजेश मुंगळे, हेमंत रिंढे, जगन्नाथ जाधव, सुभाष मोरे, बाळू पाटील ढोले, सुभाष गवळी, कल्पनाताई ढोरे, सुवर्णाताई गोंड, निवृत्ती गावंडे, रविंद्रभाऊ जाधव, ज्ञानदेव हिवाळे, शुभम उगले, बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अमोल, टप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तर या आयेजित परिचय मेळाव्याप्रसंगी २८८ युवक व ९६ मुलींनी आपला परिचय देत बायोडाटा हा आयोजन समितीकडे जमा केला.यावेळी मार्गदर्शन करांता शिवा पाटील गोंड म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ४० टक्के कुणबी मराठा समाज असून सुध्दा मुला-मुलींचे विवाह संबंध जुळविण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. तेव्हा उपवर युवक-युवती परिचय मेळाव्यांच्या माध्यमातून समाजातील युवक-युवतींची माहिती ही समाजापर्यंत पोहचण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे असे मेळावे हे भविष्य काळातील गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी करून मलकापूर येथे झालेला हा मेळावा समाजासाठी एक दिशादर्शक ठरेल असे सांगितले. तसेच येणार्या काळात जीवनसाथी पुस्तीका प्रकाशित करण्यात येणार असून त्यामध्ये कुणबी मराठा समाजातील विवाहइच्छूक युवक- युवतींची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच उपस्थित मान्यवरांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करीत समाजामध्ये असे मेळावे ही काळाची गरज असल्याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण भगत यांनी केले.कार्यक्रमाला युवराज माताडे, शरद मोरखेडे, सुरज टप, अमित हिंगणकर, रोहीत डाके, रामदास रोठे, सचिन कापसे, गोपाल गोरे, अमोल ढेकळे यांचेसह अखिल भारतीय कुणबी मराठा वधू-वर सुचक मंडळ मलकापूरच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment