शेगाव: अधिवेशनात उपस्थित प्रमुख पाहुणे अखिल भारतीय सर्व राव भाट संघटन राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामप्रतापजी भाट ,मातृशक्ती राष्ट्रीय अध्यक्षा निर्मलाजी राव,राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी श्री नरपत सिहजी भाट,श्री राधेश्यामजी भाट ,श्री कैलास चंद्रजी भाट, राष्ट्रीय सचिव श्री दीपक जी साळवी,राष्ट्रीय सदस्य श्री सुनील जी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन संपूर्ण महाराष्ट्रातून जमलेल्या शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडले या अधिवेशनाचे वैशिष्ट्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण राज्यभरातून जमलेल्या महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम व महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता ह्यावेळी राष्ट्रीय मातृशक्ती राष्ट्रीय अध्यक्षा निर्मलाजी राव, सुशीला ताई लाडसे , सौ ज्योतीताई निचल, सौ वैशालीताई बाविस्कर, सौ शारदा ताई सूर्यवंशी यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कुमारी स्नेहा बाविस्कर,शर्वरी बाविस्कर आणि कु.भैरवी चोपडे यांनी अतिशय सुरेल आवाजात सुमधुर गाण्यांचे सादरीकरण केले.ह्यात तबला वादक तेजस चोपडे यांनी साथ दिली.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शेगाव येथे पहिल्यांदाच भाट समाजाच्या वतीने भाट समाजभूषण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार दिंडी व पालखीचे आयोजन करण्यात आले ही पालखी विसावा भक्त निवास मुख्य प्रवेशद्वारापासून माळी समाज भवन पर्यंत काढण्यात आली. दिंडीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वरचित व गायलेली अनेक समाज प्रबोधन पर भजने समाज बांधवांच्या वतीने गायल्या गेली. ह्या विचार दिंडीमध्ये राज्यातील बारा ते पंधरा जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.अधिवेशनाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सन्मान सत्कार तसेच महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व जिल्हा संघटन अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा पार पडला ह्या अधिवेशनात भाट समाजातील वंशावळ लेखन करणाऱ्या मान्यवरांचा तसेच समाजातील पौरोहित करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी समाजाच्या वतीने द्वितीय स्मरणिका प्रकाशित करण्यात आली ह्या स्मरणिकेसाठी मोलाचे सहकार्य करणारे श्री विनोद केशवरावजी देशमुखे यांचाही सन्मान करण्यात आला.अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र भाट समाज राज्य महासचिव श्री अरविंद शिंदे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात राज्य संघटन राज्यात समाजाच्या विकासासाठी काम करत असताना विशेष करून युवक आणि महिला यांच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष व कार्य करणार असल्याचे उपस्थित समाज बांधवांना सांगितले, ह्या निमित्ताने त्यांनी नागपूर येथे युवकांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास व मार्गदर्शन केंद्र व महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त केला तसेच समाजाला व्यसनमुक्त करीत एक आदर्श समाज म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा संकल्प राज्य कार्यकारणी च्या वतीने करण्यात येत असल्याचे जाहीर केले .
अधिवेशनाचे प्रमुख अतिथी श्री रामप्रसादजी भाट यांनी त्यांच्या भाषणात विशेषता वंशावळ लेखक, पौरोहित्य व्यावसायिक, युवा- महिला , व्यसनमुक्ती , विवाह संस्कार अशा अनेक महत्वपूर्ण विषयावर भर देत महाराष्ट्रातील भार समाजाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी राष्ट्रीय संघटन कटिबद्ध असल्याचे नमूद केले.यावेळी मातृशक्ती राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलाजी राव यांनी महिलांसाठी अनेक योजना तसेच कार्यक्रम राबवण्याबाबत मार्गदर्शन केले.अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य अध्यक्ष श्री विनायकरावजी सूर्यवंशी यांनी राज्यातील भाट समाजाची सद्यस्थिती, समाजाला पुढे नेण्यासाठी करावयाच्या उपयोजना व भविष्यातील नियोजन याबद्दल मनोगत व्यक्त केले.अधिवेशनाच्या निमित्ताने अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार दिनानिमित्त सभागृहात उपस्थित ज्येष्ठ पत्रकार श्री उमेश गोभणे व संपादक श्री मिर्झा अक्रम बेग यांचा सन्मान करण्यात आला अधिवेशनाच्या द्वितीय सत्रात दुपारनंतर भाट समाजातील उपवरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. उपस्थित उपवारांनी त्यांचा परिचय दिला अशा प्रकारे सरते शेवटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्र वंदना कुमारी शर्वरी बाविस्कर हिने सादर करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अधिवेशनात व्यासपीठावर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह राज्य अध्यक्ष श्री विनायकरावजी सूर्यवंशी, राज्य महासचिव श्री अरविंद जी शिंदे, कार्याध्यक्ष श्री दीपक साळवी ,विभागीय उपाध्यक्ष श्री. केशवरावजी देशमुखे , श्री जनार्दनजी परिहार, श्री संतोषजी शिंदे, श्री सुधाकरजी पुजारी तसेच विभागीय सचिव श्री अप्पाजी बाविस्कर, श्री राहुलजी चोपडे, श्री मधुकरजी पुजारी, श्री संजयजी भाट तसेच महिला संघटिका सौ ज्योतीताई निचल, सौ वैशालीताई बाविस्कर, सौ.अर्चना साळवी यांच्यासह सर्व जिल्हा संघटन अध्यक्ष उपस्थित होते.अधिवेशनाचे नियोजन विभागीय सचिव श्री राहुलजी चोपडे यांच्यासह अकोला जिल्हा संघटन अध्यक्ष सुनीलजी सिरसाठ , सचिव दीपक जी क्षीरसागर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विशालजी नवले , श्री. योगेशजी नवले आणि अकोला बुलढाणा जिल्हा संघटन यांनी केले.ह्या अधिवेशनाच्या नियोजनासाठी राज्य संघटन सोबत राज्य खजिनदार श्री यशवंतरावजी जगताप , श्री विनोदजी दशमुखे , श्री गजाननजी जगताप , श्री अभिजीतजी भाट, श्री सुनीलजी चव्हाण, सौ ज्योतीताई निचल , सौ वैशाली बाविस्कर , सौ अर्चना साळवी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
Post a Comment