मलकापुर: नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भॊ. चांडक विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह श्री. दामोदर लखानी, कोषाध्यक्ष श्री. सुगंचांदाजी भंसाली, प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर, व मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण व पालकवर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने झाली. प्रा. गिरीश वैद्य यांनी ध्वजारोहन केले . त्यानंतर , राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी संस्थेमधील उपक्रमशील व गौरवशाली शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) बुलडाणा आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त करणारे श्री. शरद देशपांडे आणि उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवणारे श्री. संजयसिंह तोमर तसेच प्राथमिक विभागातून चतुर्थ क्रमांक प्राप्त करणाऱ्या कु. स्मिता मु. कोलते,यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांना 'गौरवशाली शिक्षक सन्मानपत्र' देऊन गौरविण्यात आले.माध्यमिक विभागातील विज्ञान प्रदर्शनीत तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवणारे श्री. सुधाकर राठोड आणि प्राथमिक विभागातून तालुकास्तरीय प्रथम क्रमांक व जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या सौ. भाग्यश्री म. चिमनपुरे तसेच पाठ्यपुस्तक महामंडळ, बालभारती पुणे येथे निवड झालेल्या श्री. विजय अंबुसकर, श्री. पंकज शुक्ल, व श्री. शरद देशपांडे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. 2024-25 चे 'बेस्ट स्काऊटर' पुरस्कार विजेते श्री. मंगलसिंग सोळंके यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात स्काऊट विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
चांडक विद्यालयात उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!
Hanuman Sena News
0
Post a Comment