नांदुरा : संपूर्ण जगामध्ये ज्या छत्रपती शिवरायांची ख्याती आहे त्या शिवरायांना घडवीणारी माता म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ१२ जानेवारी म्हणजेच या राजमातेची जयंती राजमाता जन्मोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.राजमाता जिजाऊंच्या महान कार्याची व त्यांच्या विचारांची संपूर्ण समाजाला नेहमीच आठवण रहावी म्हणून शिवसेना नांदुरा शहर व महिला आघाडी यांच्या वतीने सलग तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यामध्ये शुक्रवार दि. १०/०१/२०२५ रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना शहर प्रमुख,अनिलभाऊ जांगळे यांची लाभली.स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ - वृद्ध महिलांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना शहर प्रमुख महिला आघाडी सरिताताई बावस्कार यांनी केली शहरप्रमुख अनिलभाऊ जांगळे यांनी सर्व उपस्थितांना जिजाऊंच्या त्यागाबद्दल, स्वराज्यातील आपल्या अतुल्य योगदानाबद्दल माहिती सांगितली शिवसेना उपशहर प्रमुख प्रज्ञाताई तांदळे यांनी 'जिजाऊ म्हणजेच शिवबांची आई' या विषयावर माहिती देऊन जिजाऊंच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. ११ जानेवारीला निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली व 12 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमामधे धार्मिक गीतांवर नृत्य, पोवाडे, धार्मिक तथा देश भक्तीपर गीत गायनाचा समावेश होता. राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत आलेली कुमारी आरुषी सोनोने ही कार्यक्रमाची आकर्षण केंद्र ठरली.राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या चित्रकला, निबंध,नृत्य व गायन स्पर्धेमध्ये असंख्य स्पर्धक समाविष्ट झाले तीन दिवसीय झालेल्या लोक व विद्यार्थी प्रिय अशा कार्यक्रमाला माया बडवे, शिला नेमाडे, शांताबाई सातव, सोनटक्के ताई,विजया बावणे, नेहा मंडवाले, संजीवनी ठोंबरे,श्याम बडवे, प्रकाश बावस्कार, महादेव सपकाळ,संजय मेहसरे,हरीश काटले,प्रसाद नेमाडे यांच्यासह यांच्यासह इतर शिवसैनिक, महिला व मुलींचा सहभाग होता.
शिवसेना नांदुरा शहर व महिला आघाडी यांच्या वतीने तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा...!
Hanuman Sena News
0
Post a Comment